बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    उद्दिष्टे::

    • सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे – हानिकारक, भेसळयुक्त किंवा निकृष्ट उत्पादनांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी अन्न आणि औषधांच्या गुणवत्तेचे नियमन करणे .
    • कायदेशीर अंमलबजावणी कठोर करणे – उत्पादन आणि वितरणातील बेकायदेशीर पद्धती रोखण्यासाठी अन्न आणि औषध कायद्यांची अंमलबजावणी आणि समर्थन करणे.
    • अन्न व औषधे उत्पादने किंमत, परवाना आणि सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी व्यवसायांचे निरीक्षण करणे .
    • ग्राहक आणि व्यवसाय सक्षमीकरण- जनतेला आणि भागधारकांना अन्न सुरक्षा, औषध नियम आणि सर्वोत्तम पद्धतींबद्दल शिक्षित करणे .
    • औषधे ,सौंदर्यप्रसाधने व अन्न व्यवसायांमधील नैतिक व्यवसायपद्धती आणि प्रगतीला प्रोत्साहन देणे.

    कार्ये:

    • परवाना आणि मंजूरी – अन्न व्यवसाय, औषध घाऊक व किरकोळ परवाना , औषध उत्पादन परवाने, सौंदर्यप्रसाधनांसाठी परवाने देणे .
    • गुणवत्ता नियंत्रण आणि चाचणी – सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी प्रयोगशाळा चाचणी आणि तपासणी करणे. ग्राहकांना उत्कृष्ट दर्जाची औषधे मिळण्यासाठी बाजारातून नमुने काढून प्रयोगशाळेत चाचणी करणे.
    • मार्केट मॉनिटरिंग आणि पाळत ठेवणे – भेसळ आणि मिथ्याछाप प्रकरणे टाळण्यासाठी अन्न आणि औषध आस्थापनांची नियमित तपासणी करणे.
    • कायद्याची अंमलबजावणी – कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन शोधणे, कायदेशीर कारवाई करणे आणि गुन्हेगारांना दंड करणे.
    • परवानापूर्व आणि परवानाधारक आस्थापनांची तपासणी – परवाना देण्यापूर्वी आणि नंतर व्यावसायिक नियामक मानकांची पूर्तता करतात याची खात्री करणे.