दृष्टी आणि ध्येय
दृष्टीकोन विधान
“अन्न सुरक्षा आणि औषध गुणवत्ता सर्वोच्च मानके सुनिश्चित करणारा विश्वासू नियामक प्राधिकरण बनणे, नवकल्पना, अनुपालन आणि ग्राहक सशक्तीकरणाद्वारे निरोगी आणि सुरक्षित समाजाला चालना देणे.”
कार्यपद्धती
- सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे – अन्न, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्यप्रसाधने यांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेचे नियमन आणि निरीक्षण करणे, संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे.
- कायद्याची कठोर अंमलबजावणी – निकृष्ट, भेसळयुक्त आणि बनावट उत्पादनांचे प्रसार रोखण्यासाठी औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा ,व त्याखालील नियम व नियमने यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येते .
- ग्राहक जागरुकता आणि सक्षमीकरण यासाठी जनजागृती आणि डिजिटल उपक्रमांद्वारे अन्न आणि औषध सुरक्षतेबाबत जागरुकता वाढवून ग्राहकांना प्रशिक्षित करणे .
- कायद्यातील नियामक मानकांबाबत व्यावसायिकांना मार्गदर्शन करून औषधे , सौंदर्यप्रसाधने आणि अन्न क्षेत्रामध्ये नवकल्पनांना प्रोत्साहित करून अनुपालनाची संस्कृती वाढवणे.
- अन्न आणि औषध उत्पादनांची प्रभावी तपासणी, चाचणी आणि निरीक्षण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करणे .
- पारदर्शक आणि कार्यक्षम प्रशासन – सर्व नियामक कामकाजामध्ये सचोटी, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी, धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन सुनिश्चित करणे.