बंद

    परिचय

    अन्न आणि औषध प्रशासन , महाराष्ट्र सरकार, हे राज्याचे मुख्य नियामक प्राधिकरण असून जे अन्न उत्पादने, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांची गुणवत्ता आणि अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी समर्पित आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधे द्रव्ये विभागांतर्गत कार्यरत आहे. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य हे अन्न व औषधे आणि सौंदर्य प्रसाधने संदर्भातील खाली नमूद केलेले कायदे लागू करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे.

    • औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940 आणि नियम, 1945
    • औषध (किंमत नियंत्रण) आदेश, 2013
    • औषधे आणि जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954
    • अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 , त्याखालील नियम व नियमने

    अन्न व औषध प्रशासन , म.राज्य चे मुख्यालय वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे असून ते प्रशासनाचा कणा आहे. प्रशासनाची राज्यभरात विभागीय व जिल्हा स्तरावर कार्यालये कार्यरत असून त्यांचे सहकार्याने मुख्यालय वर नमूद कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करतात. अन्न व औषध प्रशासन , म.राज्य चे आयुक्त हे अन्न सुरक्षा आयुक्त म्हणून काम करतात , तसेच निकृष्ट दर्जाच्या, मिथ्याछाप , बनावट, भेसळयुक्त किंवा प्रतिबंधित केलेल्या अन्न पदार्थ आणि औषध उत्पादनांची विक्री रोखून ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांचेवर नियंत्रण करतात.

    अन्न व औषध प्रशासन , म.राज्य हे सजग निरीक्षण, तपासणी आणि जनजागृती उपक्रमांद्वारे, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण , औषध आणि अन्न उद्योगांमध्ये सुरक्षितता व गुणवत्तेची सर्वोच्च मानके राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.