प्रस्तावना

अन्न व औषध प्रशासन हा महाराष्ट्र राज्याचा एक महत्वाचा विभाग आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रामुख्याने केंद्र शासनाच्या औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियम तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम २०११ व त्यांतर्गत अधिनियमाची अंमलबजावणी करणेस जबाबदार आहेत. सदर कायद्याची अंमलबजावणी हि या कायद्यांतर्गत नेमणूक केलेल्या अधिकान्यांना प्राप्त अधिकार वापरून करणे आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी करताना प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून संभाव्य गैरवर्तणूक तसेच भ्रष्टाचार होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रशासनामध्ये आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांच्या नियंत्रणाखाली दक्षता विभागाची स्थापना केली आहे. सदर दक्षता विभागाचे प्रमुख सह आयुक्त (दक्षता) असून ते आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचे नियंत्रणा खाली कार्यरत आहेत. सह आयुक्त (दक्षता) हे भ्रष्टाचार व गैरव्यवहार याबाबतच्या तक्रारीची चौकशी करून प्रशासकीय कारवाईसाठी आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, यांना सादर करतात. महाराष्ट्राच्या सुमारे १२ कोटी जनतेला स्वछ, सुरक्षित, निर्भेळ अन्न मिळावे तसेच औषधांमध्ये गुणवत्ता उत्तम राखण्याची जबाबदारी ह्या विभागावर आहे.

अन्न व औषध प्रशासनात दक्षता विभाग एक महत्वपूर्ण कामगिरी बजावतो. प्रशासनामध्ये होणारे गैरप्रकार गैरव्यवहार व अनियमितता तसेच संभाव्य भ्रष्टाचार रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची कामगिरी दक्षता विभाग पार पाडत आहे. तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करणे तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई सुचवणे हे काम दक्षता विभाग करते. त्यामुळे दक्षता विभाग हे अन्न व औषध प्रशासनाचे खऱ्या अर्थाने नाक, कान व डोळे आहेत. प्रशासनाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्याचे कामकाज दक्षता विभाग करते.

तसेच राज्यातील अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राज्यातील अंमलबजावणी प्रभावशाली करण्यासाठी राज्यस्तरावर सह आयुक्त (दक्षता) यांच्या नियंत्रणांत गुप्तवार्ता विभाग कार्यरत आहे. गुप्तवार्ता विभागाची संरचना खालील प्रमाणे आहे.