प्रस्तावना

राज्यामध्ये दिनांक ५ ऑगस्ट, २०११ पासून नवीन अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम २०११ ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. सदर अधिनियम व त्याखालील नियम आणि नियमन यांच्या अंमलबजावणीद्वारे राज्यातील जनतेस आरोग्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व खात्रीचे अत्र उपलब्ध करून देण्याबाबतची सुविधा निर्माण झाली आहे. सदर अंबलबजावणी सुरू झाल्यानंतर विविध कायद्यांवर कार्यवाही करण्यात येते.